सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
कोदवडी फाट्यावर हॉटेल व्यावसायिक झालेल्या हल्ल्यातील आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्यात आले असल्याची माहिती साहेब पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली,
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की काल रात्री दहाच्या सुमारास कोडवडी फाट्या येथील हॉटेल श्रीनाथ यांचा मालक मस्कुल तानाजी दसवडकर व कामगार दशरथ शिळीमकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता,
या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की वांजळे व सुरवड यां ठिकाणी असलेल्या डोंगरात आरोपी लपून बसलेले आहेत, ताबडतोब पोलीस भरती त्या ठिकाणी दाखल होऊन आरोपींच्या उसका आवळल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते , पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार सोमेश राऊत पोलीस शिपाई आकाश पाटील, अजय गार्डी, बुद्धिमान मोरे, सचिन जाधव यांनी पुण्यातील आरोपींना अटक केली आहे,
24 तासाच्या आत आरोपींना अटक केल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांची आभार मानले आहेत,
