Rajgad News l अकरापैकी पाच शाळांचा शंभर टक्के निकाल; निवगुणे व मरगळे तालुक्यात प्रथम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राजगड तालुक्याने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्याचा एकूण निकाल 97.52 टक्के लागला आहे. तालुक्यातील 525 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 512 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील अकरा शाळांपैकी पाच शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विशेष यश मिळवले आहे.
तालुक्यातील सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय, रुळे येथील संस्कृती तानाजी मरगळे आणि पूर्वा प्रदीप निवगुणे या दोन्ही विद्यार्थिनींनी 92.40 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तोरणा विद्यालय, वेल्हे येथील 72 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. प्राचार्य संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तोरणासागर विद्यालय, निवी येथील 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाने शंभर टक्के निकाल मिळवला. मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सदस्य व प्राचार्य मोहन किन्हाळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. राजे शिवछत्रपती विद्यालय, सोंडे माथना येथील 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. प्राचार्य सुभाष वाल्हेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दादोजी कोंडदेव विद्यालय, वांगणी येथील 16 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने 100 टक्के निकालाची नोंद केली. प्राचार्य संजय पगारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय, रुळे येथील 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने 100 टक्के निकालासह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मानही पटकावला आहे.
याशिवाय सरस्वती विद्यालय, अंबवणेचा निकाल 96.22 टक्के लागला असून प्राचार्य अनिल गरड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडेचा निकाल 97.05 टक्के लागला असून प्राचार्य बाजीराव पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

न्यू इंग्लिश स्कूल, पासलीचा निकाल 94.44 टक्के लागला असून प्राचार्य क्षमा सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. न्यू इंग्लिश स्कूल, विंझरचा निकाल 96.10 टक्के लागला असून प्राचार्य भगवान बेल्हेकर यांनी समाधान व्यक्त केले.
राजगड विद्यालय, वाजेघरचा निकाल 97.29 टक्के लागला असून प्राचार्य अजितकुमार कोंढाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच वीर बाजी पासलकर विद्यालय, पानशेतचा निकाल 97.01 टक्के लागला असून प्राचार्य संजय अहिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
To Top