Satara Crime l सातारा शहरात अवैध दारू वाहतूक उघड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी किकली (ता. वाई) येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप विजय बाबर (वय 30, रा. सदरबझार सातारा, मूळ रा. किकली ता. वाई जि. सातारा) हा एमएच 11 डीए 3160 क्रमांकाच्या कारमधून व्हिस्की व बिअरची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहू चौक ते पोवई नाका मार्गावरील एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटसमोर पोलिसांनी सापळा रचला. संशयिताच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्की व बिअरचे तब्बल 27 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारूसह वाहन असा एकूण 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच पोलिस कर्मचारी निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम व सचिन रिटे यांच्या पथकाने केली.
To Top