सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद बळवंत कांबळे यांनी आज आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
कारखाना निवडणुकीला अजून चार महिने कालावधी बाकी असून या चार महिन्यांच्या कालावधीसाठी उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सभासदांच्या नजरा लागल्या आहेत.
आज सकाळी सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला. यावेळी संचालक शैलेश रासकर, adv. नवनाथ भोसले, दीपक साखरे, गणेश जाधव, पंडित होळकर, अमर होळकर, राहुल वायाळ, प्रमोद वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
