सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात आणखी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे फसवणूकग्रस्तांनी तातडीने पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणात कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे, BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE आणि BIG BULL TRADING COMPANY यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे.
तपासात आरोपींनी स्वतःला शेअर मार्केटमधील अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ तसेच SEBI मान्यताप्राप्त असल्याचा भास निर्माण करून नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आलेझ आहे.
आरोपींनी मूळ रक्कम सुरक्षित राहील, तोटा झाला तरी जबाबदारी आमची राहील आणि मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम स समोर आले आहे. तसेच सुरक्षिततेसाठी दिलेले काही धनादेश बाऊन्स झाल्याची बाबही उघड झाली आहे.
या प्रकरणात आणखी अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय असून, शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ट्रेडिंग कोर्स किंवा निश्चित परतावा योजनांच्या नावाखाली संबंधित आरोपी किंवा संस्थांकडे पैसे गुंतविलेल्या सर्वांनी आवश्यक कागदपत्रांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रक्तदीप भंडारे हे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. तसेच फसवणूकग्रस्तांनी दिलेल्या माहिती व कागदपत्रांची गोपनीयता राखली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
