Baramati News l बार्शीचे मा. आमदार तथा सोमेश्वर कारखान्याचे मा. अध्यक्ष शहजीराव काकडे यांचे सासरे कृष्णराव देशमुख यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बार्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कृष्णराव नानासाहेब देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन झाले ते ९३ वर्षांचे होते.  
              १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी बार्शी मतदारसंघाचे नेतृत्व केले. सहकार महर्षी स्व. मुगुटराव काकडे देशमुख यांचे व्याही तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे देशमुख यांचे सासरे होत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे ते भाचे जावई होत. 
त्यांच्या निधनाने सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तिामत्व हरपले आहे.
त्यांचे पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. 
To Top