Baramati News l बारामतीच्या होळ गावचा सुपुत्र अमेरिकेत चमकला : 'युडीएलएपी' विद्यापीठातून मिळवली मास्टर्स डिग्री

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) येथील मयूर बाळासाहेब इदवते याने अमेरिकेतील 'युडीएलएपी' या विद्यापीठाद्वारे 'इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट' या विषयात मास्टर्स डिग्री (एमएस) प्राप्त केली आहे. नुकतीच विद्यापीठात पार पडलेल्या पदवीप्रदान सोहळ्यात ही पदवी देण्यात आली. परदेशातील नामांकित पदवी प्राप्त करणारा तो होळसारख्या ग्रामीण भागातील पहिलाच विद्यार्थी आहे.
सोमेश्वर विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मयूरने पिंपरी चिंचवड येथील इंजिनअरिंग कॉलेजमधून बी.ई. मेकॅनिकल पदवी प्राप्त केली. 
यानंतर एका खासगी कंपनीद्वारे अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली. नोकरी करत करत त्याने जागतिक व्यापार व्यवस्थापनाचा अभ्यास अमेरिकेतील मेक्सिको येथील नामांकित अशा 'डे लास अमेरिकास प्युब्ला' या विद्यापीठातून पूर्ण केला. विद्यापीठाच्या ८२ व्या पदवीप्रदान सोहळ्यात त्याला मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करत गौरविण्यात आले. 
मयूर हा पुणे जिल्हा बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेचे वरीष्ठ व्यवस्थापक बाळासाहेब इदवते यांचा मुलगा आहे. सोमेश्वरनगर पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To Top