Grampanchayt election l बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी..! 'या' तारखेला सदस्य आरक्षण सोडत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवार, दि. १२ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २५ मे २०२६ रोजीच्या मार्गदर्शक सूचना तसेच २६ मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रांतील सन २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतनिहाय अध्यक्षीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गटविकास अधिकाऱ्यांकडून नियुक्त ग्रामपंचायत अधिकारी सहायक अध्यक्षीय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
खराडेवाडी, कन्हेरी, पाहुणेवाडी, झारगडवाडी, वाकी, वडगाव निंबाळकर, उंडवडी सुपे, तरडोली, सोनगाव, शिरसने, सांगवी, पिंपळी, निंबुत, नारोळी, मोढवे, मेखळी, माळवाडी लोणी, माळवाडी लाटे, कोऱ्हाळे बु., कटफळ, जैनकवाडी, जोगवडी, होळ, देऊळगाव रसाळ, बऱ्हाणपूर, मोराळवाडी आणि कोळोली या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १० वाजता आरक्षण सोडत होणार आहे.

मळद, वढाणे, सोनवडी सुपे, शिरवली, सावळ, निरावागज, माळेगाव खुर्द, लाटे, खांडज, खंडोबाचीवाडी, थोपटेवाडी, कांबळेश्वर, कारखेल, जळगाव सुपे, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी, घाडगेवाडी, गोजुबावी, ढेकळवाडी, ढाकाळे, खामगळवाडी, चोपडज, बाबुर्डी, आंबी खुर्द, अंजनगाव आणि मुर्टी या ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३ वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडणार आहे.

तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
To Top