Rajgad Breaking l गाईला वाचवताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सिंगापूर-कुसारपेठ येथे दुर्दैवी घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील सिंगापूर कुसारपेठ येथील 55 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सिंगापूर कुसारपेठ येथील शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला असताना येथील डोंगर वर गाई चरत असताना शेजारी असलेल्या विजेच्या खांबाची तार तुटली व गाईच्या अंगावर पडली यावेळी गाईला वाचविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला देखील विजेचा शॉक बसला व त्याचा मृत्यू झाला. 
विठ्ठल भागू ढेबे (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत गाईचा देखील मृत्यू झाला आहे.
विजेचे खांबावर तारा जोडण्यासाठी असलेल्या चिनी मातीच्या भांड्याला उन्हामुळे तडा गेला व ते भांडे फुटले आणि तार तुटून शेतकरी व गाईला शॉक बसला. त्यांच्यातच त्यांचा मृत्यू झाला. असे महावितरण कडून सांगण्यात आले.
याबाबत  महावितरण चे उपअभियंता सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली कुसारपेठ येथील घटनेचा पंचनामा केला असून  नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला कळवले असल्याचे सांगितले,
To Top