सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'आंतररराष्ट्रीय योग दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील शाळेच्यावतीने इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात योग मंत्राने करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ रहावे.
त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी. त्यांना उत्तम आरोग्यासाठी 'योग' ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका शोभा लोणकर यांनी व्यक्त केले.
तसेच विद्यालयातील कलाशिक्षक वैभव लोणकर तसेच शिक्षिका जे. डी. गायकवाड, एस. ए. मदने, ए. यू. नांदखिले यांनी विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योगासनाचे आणि प्राणायमाचे महत्त्व पटवून दिले. विविध योगासने आणि श्वसनक्रियांची प्रात्यक्षिके करून घेत नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावीत असा सल्ला योग शिक्षकांनी दिला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा लोणकर, पर्यवेक्षक एस. एस. बिडवे, केंद्र प्रमुख शरद मचाले यांच्यासह या उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकामी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. यू. झगडे यांनी आभार मानले.
