सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीत डाळज क्रमांक १ येथील ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र शेलार यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाली आहे. २८ जून रोजी झालेल्या निवडणुकीत मध्ये निवड झाली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवींद्र शेलार हे अत्यंत शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी भिगवण, शेटफळ गडे, तक्रारवाडी आणि भादलवाडी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून प्रभावीपणे कामकाज सांभाळले आहे. सध्या ते डाळज क्रमांक १ येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि नागरिकांच्या अडीअडचणी तत्परतेने सोडविण्याच्या भूमिकेमुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायत अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच विविध स्तरांतून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
निवडीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र शेलार म्हणाले, जनतेचे प्रेम आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये माझी नेमणूक झाली तरी त्या ठिकाणच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे हेच माझे प्रथम कर्तव्य राहील.
