सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील एका शहरामध्ये राहणाऱ्या विवाहीत महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेवुन तुझ्या सासुची भांडणे मिटवून नवऱ्याला चांगला धडा शिकवतो असे म्हणत विवाहितीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपी रवि जगन घाडगेस मेढा पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
याबाबत दिलेल्या माहिती नुसार दिनांक ४ जुन रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मेढा शहरालगत असलेल्या ठिकाणी वडिलांचे घरामध्ये विवाहीत एकटी असताना फिर्यादीचे ओळखीचे रवी जगन घाडगे राहणार मानेवाडी पोस्ट गजवडी तालुका जिल्हा सातारा हे फिर्यादीचे घरी येऊन मी तुझी सासू सोबत झालेली भांडणे मिटवतो व तुझ्या नवऱ्याला चांगला धडा शिकवतो पण तुला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील असे बोलून फिर्यादीला जबरदस्तीने घरातील बेडवर घेऊन जाऊन बेडरूमचा दरवाजाची कडी लावून फिर्यादीचे तोंड दाबून जास्त कालवा करू नकोस नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून फिर्यादीला बेडवर आडवे पाडून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध केला असल्याची माहिती फिर्यादीने मेढा पोलीसांना दिली. तसेच फिर्यादीने झालेला अतिप्रसंग मला सहन न झाल्याने मी घरातील फरशी पुसण्याचे फिनेल पिले होते असल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
पिडीत विवाहीत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून मेढा पोलीस आरोपी रवि जगन घाडगे याच्यावर गु र नं मेढा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 121/2026 भारतीय न्याय संहिता 64(1), 333, 351(3), प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन या गुन्ह्याला तपास सपोनि सुधिर पाटील यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंगटे करीत आहे.
