सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवरील (कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत कोयना नदी) लाभधारकांनी कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११,४९ मधील तरतुदीनुसार ७ जून पर्यंत कोयना नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी करण्यात आली आहे.
याकाळात केवळ पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
उपसा बंदीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
दि.०४ जून ते ७ जून २०२६ पर्यंत उपसाबंदी राहील . दि. ८ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीमध्ये उपसा सुरू राहील. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन
प्राप्त परिस्थितीनुसार पुढील नियोजन करणेत येईल.
उपसा बंदी असलेल्या कालावधीत कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करणेत येईल, याची गांभीर्याने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे,
तसेच धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणी नाश टाळण्यास सहकार्य करावे. जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानून पाणी वाचवूया व देश वाचूया असे आवाहन कोयना सिंचन विभाग कोयना नगरचे कार्यकारी अभियंता वि.बा. सानप यांनी केले आहे.
