बारामती l निधन वार्ता l आदर्श शिक्षिका वासंतिका जगताप यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील आदर्श शिक्षिका वासंतिका मनोहर जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. 
           त्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. वाणेवाडी गावातील एक ज्येष्ठ शिक्षिका म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जायचे. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

साद संवाद स्वच्छता ग्रुपचे सदस्य विजय मनोहर जगताप व सचिन मनोहर जगताप यांच्या त्या मातोश्री होत.
To Top