Purandar News | किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचा 'आदर्श स्कूल' पुरस्काराने गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे 
सासवड नगरपालिका हद्दीतील सरस्वती ज्ञान संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा 'आदर्श स्कूल' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुण्यातील आगरकर रोडवरील सारथी सभागृहात आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सरस्वती ज्ञान संस्थेचे संस्थापक श्रीकांत जगताप आणि किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा जगताप यांनी पुरस्कार स्वीकारला. भाजप शिक्षक आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार प्रा. मेघाताई कुलकर्णी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षक आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष प्रा. सुनील मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
त्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभारण्यात आलेल्या किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलने परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय 'आदर्श स्कूल' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानामुळे शाळेवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून विविध स्तरांतून शाळेचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशामध्ये संस्थापक श्रीकांत जगताप, मुख्याध्यापिका मनीषा जगताप, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
To Top