सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूजा संदीप निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर यापूर्वीच्या उपसरपंच नयना जगताप यांनी राजीनामा दिल्याने पूजा निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांनी काम पाहिले. याप्रसंगी माजी उपसरपंच नयना जगताप, सदस्य शंकर शेंडगे, सुधीर बारवकर, विशाल चांदगुडे, शफिक बागवान, अश्विनी सकट, वैष्णवी बारवकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
