Pachgani News | राष्ट्रगीत, खेळ आणि आठवणींची मेजवानी; केंद्र शाळा भिलारच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाचगणी : सचिन भिलारे
केंद्र शाळा भिलारच्या 1992 सालच्या सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मैत्री मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल तीन दशकांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि शाळेच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर विविध मनोरंजनात्मक खेळ, संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या आणि मनोगत सत्रांमधून सर्वांनी शालेय दिवसांच्या आठवणी जागवल्या.
मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले योग व ध्यान प्रशिक्षक महिंद्र भिलारे यांचे मार्गदर्शन. त्यांनी योग व ध्यानाचे महत्त्व सांगत तणावमुक्त आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याबाबत उपस्थितांना प्रेरित केले.
मुंबई, सातारा, पाचगणी व परिसरातील विविध भागांतून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्‌ने झाली, त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महिंद्र भिलारे, संजय भिलारे, राजाराम बिरामणे, सचिन भिलारे आणि वसंत भिलारे, बिपिन भिलारे यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमेळाव्यामुळे आनंद, आपुलकी आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
To Top