सुपे परगणा l सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे योगाभ्यासाचे सत्र घेण्यात आले. 
       विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख मार्गदर्शक झुंबा आणि एरोबिक्स प्रशिक्षक यश खलाटे आणि योग प्रशिक्षक स्वाती घुले उपस्थित होते.
       विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे योगाभ्यासाचे सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रशिक्षक मा. यश खलाटे यांनी विद्यार्थ्यांना 'झुंबा' आणि 'एरोबिक्स'चे महत्त्व सांगत, संगीताच्या तालावर हलके फुलके व्यायाम प्रकार आणि प्रात्यक्षिके करून घेतली. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.
          योग प्रशिक्षक स्वाती घुले यांनी दैनंदिन आयुष्यात योगाचे आणि प्राणायामाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितले. केवळ व्याख्यान न देता, त्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध आसनांची अचूक प्रात्यक्षिके करून घेतली. नियमित योगामुळे एकाग्रता कशी वाढते आणि ताणतणाव कसा दूर होतो, याचे थेट धडे विद्यार्थ्यांना दिले.
            येथील कार्यक्रम यशस्वी करण्याकामी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि सक्रिय सहभागामुळे हा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चांदगुडे यांनी केले. तर आभार दादा राऊत यांनी मानले.
        

To Top