सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निंबुत ता. बारामती येथील राहुल शामराव काकडे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईतील मस्जिद बंदर येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी चेअरमन दत्तात्रय पानसरे, श्री. हिंगणकर, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जयकुमार राऊत, श्री. महाजन तसेच चेअरमन रोहित निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगण्यात आले.
निवडीनंतर राहुल काकडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत, शेतकरी, सहकारी संस्था आणि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील कृषी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
