Pune News | जप्त 93 वाहनांचा 10 जून रोजी ऑनलाईन ई-लिलाव; वाहन मालकांना अंतिम संधी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पिंपरी चिंचवड, दि. ३ : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली तसेच मोटार वाहन कर न भरल्याने संबंधितांनी न सोडवून घेतलेली एकूण 93 वाहने ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. हा ई-लिलाव 10 जून 2026 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जप्त वाहनांचा लिलाव ‘भंगार’ स्वरूपात करण्यात येणार असून, केवळ Registered Vehicle Scrapping Facility (RVSF) संस्थांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
लिलावासाठी ठेवलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवडच्या आवारात तसेच राजगुरूनगर बस डेपो आणि मंचर बस डेपो येथे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे. दरम्यान, संबंधित वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा हितसंबंधित व्यक्तींना लिलावाच्या तारखेपूर्वी शासकीय थकबाकी भरून अथवा आवश्यक कागदपत्रांसह हक्क सिद्ध करून वाहने सोडवून घेण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. तसेच लिलावाबाबत कोणतीही हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात पुराव्यासह सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

ई-लिलावातील वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार लिलाव रद्द करणे किंवा तहकूब ठेवण्याचा अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.‌
Tags
To Top