Baramati News l बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा वडगाव निंबाळकर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
वडगाव निंबाळकर ता. बारामती बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथे स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आधुनिक शेती, ग्रामीण विकास आणि कृषी जनजागृतीसंदर्भातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविणे, कृषीविषयक जनजागृती करणे तसेच विविध ग्रामविकास उपक्रम राबविणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन किसन तांबे, संचालक राजवर्धन शिंदे, लक्ष्मण गोफणे, मिलिंद कांबळे, शिवाजी राजे निंबाळकर, मुख्य शेती अधिकारी बापूराव गायकवाड तसेच ॲग्रो ओव्हरसीअर धनंजय खोमणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या भाग्यश्री गायकवाड, वेदांतिका चव्हाण, स्वाती ढवणे, ऋषिता गावित, श्रुती घुले, आकांक्षा जराड, देविका कांबळे आणि दीक्षा शेळकंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळण्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
To Top