Jawali News l केळघर येथील नवीनच बांधलेला रामजीबुवा पुलाचा रस्ता खचला : वाहनधारकांच्यात भितीचे वातावरण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मेढ : सोमनाथ साखरे 
सातारा-मेढा-महाबळेश्वर या प्रमुख मार्गावर असलेला ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याठिकाणी नुकताच नवीन पूल उभारण्यात आला होता. केळघर-आंबेघर येथील या 'रामजीबुवा पुलाचे' काम नुकतेच पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
 मात्र, पहिल्याच मुसळधार पावसामुळे या नवनिर्मित पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता अचानक खचल्याची घटना घडली आहे. रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील मोठ्या आणि जड वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहनधारकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत भराव टाकण्याचे काम करून वाहनधारकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.
         पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता खचल्याचे वृत्त समजताच  विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नये आणि वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी तातडीने खचलेल्या भागावर मुरूम आणि दगडांचा भराव टाकून रस्ता दुरुस्त केला ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
To Top