नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी Good News l वीर धरण ८७ टक्के भरले : नीरा नदीला सुटणार पाणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : अक्षय इथापे 
नीरा देवघर, भाटघर व गुंजवनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने दिनांक ०८/०७/२०२६ दु. २.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.७५ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ८.२१ टीएमसी. झाला असून वीर धरण ८७.२७% इतके भरले आहे.
वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या ४ ते ५ तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल. 
नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन पाटबंधारे खात्याने केले आहे.
To Top