बारामती l भरधाव ट्रकच्या जोरदार धडकेत महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू : मोरगाव-सुपे रस्त्यावरील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
मोरगाव–सुपे मार्गावर शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी हर्षदा जनार्दन खैरे (वय २०) रा. खंडूखैरेवाडी ता. बारामती हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
       मिळलेल्या माहितीनुसार, हर्षदा व तिची मैत्रीण सोमेश्वरनगर येथे कॉलेजमध्ये आल्या होत्या. हर्षदाने मॅकेनिकल डिप्लोमाचे शेवटचे शेवटचे वर्ष पूर्ण केले होते. डिग्रीच्या पुढील प्रवेशासाठी त्या आज सोमेश्वरनगर येथील कॉलेजवर आल्या होत्या. घरी जाताना ही दुर्दैवी घटना घडली. हर्षदा दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर फेकली गेली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तिचा जागीच मृत्यू झाला.
   घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. 
या प्रकरणी ट्रकचालक बाबुराव आसाराम ढाकणे (रा. ढाकणवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोपट गणपत खैरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल के. व्ही. ताडगे यांनी माहिती दिली. अधिक तपास सुपे पोलीस स्टेशनचे महिला हवालदार रजनी धायगुडे करीत आहेत.
या आठवड्यातील हा दुसरा मृत्यू--
बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे इंजीनियरिंग शिक्षणाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी दुचाकी गाडीवरून प्रवास करत असतात. या प्रवासाच्या दरम्यान प्रमुख मार्गावर असलेली वाहतूक यातूनच या अपघातांचे प्रकार वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी 'मुर्टी'गावातील करण भगत नावाचा मुलगा सोमेश्वरनगर येथे सायन्स चे शिक्षण घेत होता. त्याला सहा दिवसांपूर्वी भरधाव चारचाकीने नीरा बारामती रस्त्यावर वाघळवाडी येथे उडवले होते. त्याचा काल पुणे येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. 
             
To Top