इंदापूर l भिगवणमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना; स्वतःच्याच नातीवर अत्याचारप्रकरणी आजोबा अटकेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भिगवण : प्रतिनिधी
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात गतिमंद असलेल्या अल्पवयीन निर्भयावर नात्यातील आजोबाने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निर्भयाच्या आईने तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार सदर प्रकार भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून यातील आरोपी हा निर्भयाचा आजोबा असून सुद्धा नात्याला काळिमा फासल्यांचा प्रकार घडला आहे. 
याबाबत प्रेस नोट मध्ये नमूद केल्या नुसार आरोपी ने आपली नातं अल्पवयीन असून ती गतिमंद आहे याची माहिती असताना सुद्धा राहत्या घरात निर्भया कडून हात पाय दाबून घेत तिच्या मनाविरुद्ध तिची छाती दाबून जबरदस्तीने अत्याचार केला. याची माहिती निर्भयाच्या आईला मिळाल्याने तिने तातडीने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
 भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेत तातडीने 67 वर्षीय आरोपीला अटक करीत तपास सुरु केला आहे..
To Top