सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे: प्रतिनिधी
लोणावळा धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या अनियंत्रित सांडव्यावरून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन केले असून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.आळंदीतील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी शहरातील नदीवरील सर्व पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी यासंबंधीची अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
