सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर दि.२८ माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश अपंग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबआप्पा घिसरे यांच्या वतीने भिवरी( ता. पुरंदर )येथील श्री कानिफनाथ विद्यालयात शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावचे माजी सरपंच तथा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बारिकराव खेसे होते. प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मनोहर कामठे उपस्थित होते.
यावेळी सरपंच मोनाली कटके, सल्लागार समिती अध्यक्ष संदीप कटके , माजी सरपंच दिलीप कटके,वीर नेताजी मंडळाचे अध्यक्ष चांगदेव घिसरे, गोसावीबुवा मंडळाचे अध्यक्ष नवनाथ भिसे, चेअरमन म्हस्कु कटके,तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत कामठे, पोलिस पाटील सचिन दळवी,बाबाजी घिसरे,अमोल कटके,सुरेखा ढवळे, बाळासाहेब फडतरे, तुकाराम कटके,बाळासाहेब नाटकर,तुकाराम कटके,शेखर कटके,बाळासाहेब कटके, रणजीत घिसरे , शंकर घिसरे, संभाजी घिसरे, पमाआण्णा कटके, मंगेश ढवळे सर्व शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळाले. गणेश अपंग प्रतिष्ठानच्या वतीने गेली २८ वर्ष सुरू असलेल्या गणवेश वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण होते आणि शिस्तीला प्रोत्साहन मिळते असे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी मनोगतामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता खेसे यांनी केले.सुत्रसंचालन मोहिनी लोणकर यांनी केले.तर आभार प्रज्ञा वाघमारे यांनी मानले.
