सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील केळद खिंडीतील रस्ता पूर्णपणे खचला असून परिसरातील १४ गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या चार दिवसांपासून राजगड तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून वेल्हे मढेघाट रस्त्यावरील अहिल्या नगर येथे दरड कोसळली असून रस्ता बंद झाला आहे.
तर केळद खिंडीतील रस्ता ६०० मीटर पर्यंत खचला असून मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. जास्त पाऊस झाल्यास हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजगड तालुक्यातील पासली ते केळद खिंडीत रस्ता पूर्ण खचल्यामुळे मढे घाटाकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे . केळद, निगडे , भोर्डी, पिशवी,एकलगाव,सिंगापूर, मोहरी,कुंबळे, गोपे या गावाचा संपर्क पूर्ण तुटलेला आहे.
तर भट्टी रस्त्यावर देखील दरड कोसळली असून सार्वजनिक बांधकाम विभाग कडून जेसीबीच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. तर अहिल्याबाई नगर या ठिकाणी देखील रस्त्यावर माती वाहून आली आहे. त्यामुळे पासली, गृहिणी, हारपूड, शेणवड, बालवड, जाधववाडी, आदी परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.
