Baramati News l वडगाव निंबाळकर येथे गुलाब पिकातील विशेष उद्यानविद्या पद्धतींचे प्रात्यक्षिक संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी कुमार शिवतेज सुनील ढोले यांच्या शेतावर गुलाब पिकातील विशेष उद्यानविद्या पद्धतींचे प्रात्यक्षिक आयोजित केले.
या प्रात्यक्षिकामध्ये गुलाब पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये छाटणी, फांद्या वाकविण्याची पद्धत, अतिरिक्त कळ्या काढणे, कोमेजलेली फुले वेळीच हटविणे, रोगग्रस्त व सुकलेल्या फांद्या काढणे तसेच निष्फळ फांद्यांची ओळख करून त्यांचे व्यवस्थापन करण्याबाबत माहिती देण्यात आली.
या विशेष उद्यानविद्या पद्धतींचा अवलंब केल्यास गुलाब पिकाची निरोगी वाढ होऊन दर्जेदार फुलांचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या प्रात्यक्षिकामध्ये अकांक्षा जराड, श्रुती घुले, वेदांतिका चव्हाण, वृषिता गवित, दीक्षा शेलकंदे आणि देविका कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
To Top