सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे–कुदळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत गावाचा नावलौकिक वाढविला आहे. या यशाबद्दल आनंद व्यक्त करत ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जगताप, शिक्षक विजय कापरे, सहशिक्षिका सुनिता जगताप व पुष्पा हिंगणे तसेच यशस्वी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ताताई दुर्गाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष आबा निगडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना डॉ. प्राजक्ताताई दुर्गाडे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखावे, असे आवाहन केले. तसेच शाळेच्या विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उद्योजक प्रशांत शेठ शिंदे यांच्या वतीनेही यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र समता परिषदेचे पुरंदर तालुका अध्यक्ष संतोष कुदळे, पोलीस पाटील सोनाली कुदळे, माजी सरपंच मालन झगडे, माजी उपसरपंच सुनंदा कुदळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल कुदळे, मेजर विठ्ठलराव झगडे, सदाशिव कुदळे, पैलवान छगनराव लव्हाळे, राहुल नाणेकर, लक्ष्मणराव झगडे, ह.भ.प. ज्ञानदेव दादा कुदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे, उद्योजक धनंजय कुदळे, तृप्तीताई लव्हाळे, सिमाताई लव्हाळे, योगेश शिंदे, मेघाताई लव्हाळे, उर्मिलाताई लव्हाळे, मंगलताई रासकर, विद्याताई शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल कुदळे यांनी मानले. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
