Bhor News l भोरला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाबद्दल राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली.
      जानेवारी २०२६ मध्ये आकस्मिक अपघाती दुःखद निधन झालेनंतर हिमालयाएवढे दुख बाजुला सारुन दादांच्या विचाराचा वारसा सक्षमपणे चालविणा-या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे विरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव अत्यंत निषेधार्ह आहे.
अशा प्रकारची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी व महिला नेतृत्वाचा व विशेषकरुन अपमान करणारी आहेत.हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर तालुका तीव्र निषेध व्यक्त करून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,माजी जि.प.सदस्य रणजीत शिवतरे, जि. प.सदस्य प्रवीण जगदाळे,सभापती मनीषा कंक,शहराध्यक्ष संदीप शेटे,अनिल पवार,सोमनाथ ढवळे,सुनील भेलके,नितीन सोनवले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
To Top