Baramati News l खोपवाडीतील गायरान वस्तीवर चोरट्यांचा डल्ला; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील दंडवाडी अंतर्गत खोपवाडी येथील गायरान वस्तीवर बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
अमर दिलीप कदम यांच्या कुटुंबीयांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री घराला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्याने शेजारील बंद खोलीचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ८० हजार रुपये रोख तसेच सुमारे एक लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले.
    घरातील महिलेला सकाळी शेजारील खोलीचा दरवाजा उघडा असुन चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कदम यांनी सुपे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस हवालदार रजनी धायगुडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
   सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जयवंत ताकवणे तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लवकरच चोरट्याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती नवसरे यांनी दिली.
To Top