Baramati News l बेंचमेट मित्राची आजाराने एक्झिट; जुन्या वर्गमित्रांची माणुसकी, कुटुंबाला आर्थिक मदत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
सोरटेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी संतोष पांडुरंग ननावरे यांचे २० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि सोरटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 
        संतोष ननावरे हे १९९१ बॅचचे माजी विद्यार्थी होते. त्यांचा शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे मित्रपरिवारात त्यांचे वेगळे स्थान होते. संतोष ननावरे यांनी सोरटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून सेवा बजावत असताना गावातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, आपल्या सहकारी मित्राच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. १९९१ बॅचच्या वतीने ननावरे यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रुपयांची सांत्वनपर मदत देण्यात आली.

या वेळी १९९१ बॅचचे माजी विद्यार्थी तसेच सोरटेवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दुःखाच्या प्रसंगी दिवंगत मित्राच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. या मदतीमुळे ननावरे कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
To Top