Rajgad News l कामाचा ताण वाढला, मोबदला मात्र नाही; उमेद ग्रामसखींचा ऑनलाइन काम बंदचा इशारा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे 
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होईपर्यंत गाव व प्रभाग स्तरावरील ग्रामसखींचे संघटनेने २४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत राजगडमध्ये ग्रामसखींच्या वतीने पंचायत समिती सदस्य सीता खुळे, तालुका अभियान व्यवस्थापक विशाल पिसाळ व ज्ञानेश्वर ढेंबरे यांना निवेदन देण्यात आले.
उमेद अभियानातील ग्रामसखी व इतर कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांपासून विविध समस्या भेडसावत असून, याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
ग्रामसखींचे मासिक मानधन १५ हजार रुपये, नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यूच्या प्रसंगी १० लाख रुपयांचा विमा किंवा सामूहिक अनुदान लागू करावे, मागील सात महिन्यांत मृत्यू झालेल्या ग्रामसखींच्या कुटुंबीयांना लाभ, प्रभाग समन्वयक व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, भत्ते, सेवासुविधा लागू कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

उमेद अभियानांतर्गत ग्रामसखींकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन तसेच भौतिक कामे करून घेतली जात असल्याने कामाचा ताण वाढत आहे. ऑनलाइन कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून ऑनलाइन कामाचा स्वतंत्र मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
To Top