सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगदरी येथील विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा कार्ड पाठविले असल्याची माहिती मुख्याध्यापक साधू हारपुडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना हारपुडे म्हणाले शाळेतील मुलांनी राखी व शुभेच्छा कार्ड बनविण्याचा उपक्रम हाती घेतला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी लागणारे साहित्य गोळा केले. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा कार्ड बनविले.
भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता देशाची सेवा करत आहेत त्यांच्यामुळेच आपण सर्व भारतीय अनेक सण उत्सव आनंदाने साजरे करत असतो अन त्यामुळे रक्षाबंधन या सणाच्या दिवशी हे भारतीय सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात त्यामुळे या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता देश प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेने रक्षाबंधन निमित्त या भारतीय सैनिकांना स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्या तसेच सुंदर भेटकार्ड आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पत्रे देखील लिहिली.
पुण्यातील आधार फाऊंडेशन या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या ह्या राख्यांची प्रेमपूर्वक भेट आपण त्यांच्या सुपूर्द केली. आणि लवकरच ह्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचतील. उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम सैनिकाविषयी असलेली कृतज्ञता सामाजिक बांधिलकी भावनिक विकास , देशभक्ती, सैनिका प्रति कृतज्ञता , या गुणांचा विकास निश्चित होण्यास मदत होईल.उपक्रमसाठी मुख्याध्यापक साधु हारपुडे, शिक्षिका वर्षा भोज, अशोक डोंबे यांनी प्रयत्न केले.
उपक्रमाचे व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे केंद्रप्रमुख शकील श्मुल्ला गटशिक्षण अधिकारी .अजित पाटील सभापती सुवर्णा राऊत, उपसभापती संदिप खुटवड, गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
