Bhor Accident l भोरला खंडोबा माळावरील अपघातात तरुण गंभीर जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर-कापूरव्होळ मार्गावरील खंडोबा माळाच्या वळणावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) सायंकाळी घडली. जखमी तरुणाला नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी अज्ञात चारचाकी वाहन भोरच्या दिशेने येत होते, तर दुचाकीस्वार कापूरव्होळच्या दिशेने जात होता. खंडोबा माळावरील वळणावर दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला. त्याच्या हाताला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेला दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
रुग्णवाहिकेचे चालक सचिन राऊत तसेच डॉ. मिलिंद कांबळे यांनी तत्परतेने प्राथमिक उपचार केल्याने जखमी तरुणाला काही मिनिटांत वैद्यकीय मदत मिळाली. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
To Top