सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इच्छा व्यक्त केली आहे.
आमदार पवार यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बाबतीत राज्यातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या सोमेश्वर (बारामती) सहकारी साखर कारखान्याची लवकरच निवडणूक होऊ घातलीय.
गेली अनेक वर्षे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याने साखर उद्योगात आपला एक स्वतंत्र असा ठसा उमटवलाय. दुर्दैवाने अजितदादांना जाऊन एक वर्षही झालं नाही, अशा परिस्थितीत अजितदादांच्या कर्तृत्त्वाकडं आणि नेतृत्वाकडे पाहून या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने कार्यक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करावी आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ज्याप्रमाणे कारखाना चालत होता त्याच पद्धतीने यापुढंही शेतकऱ्यांचं हीत डोळ्यासमोर ठेवूनच कारखाना चालवावा, अशी माझी व्यक्तीगत इच्छा आहे.
शेवटी हे सहकार क्षेत्र असल्याने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं राजकारण बाजूला ठेवलं तर उत्तमच आहे आणि हीच अजितदादांनाही खरी श्रद्धांजली ठरेल.
