सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर l संतोष म्हस्के
भोर शहरातील नामांकित स्वप्नलोक सोसायटीतील पाच बंद घरे चोरट्यांनी १ ऑगस्टला रात्रीच्या वेळी फोडून सोन्यासह ६ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.याची फिर्याद अविराज अशोक मालुसरे स्वप्नलोकनगरी भोर मुळगाव - लव्हेरी यांनी भोर पोलिसात दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोर शहरातील स्वप्न लोक नगरी येथील वेगवेगळ्या पाच बिल्डिंगमध्ये चोरट्यांनी १ ऑगस्टला रात्रीच्या वेळी पाच फ्लॅट फोडून रोख रक्कम ६२ हजार ५०० तसेच सोन्याचे - चांदीचे दागिने ५ लाख ६८ हजारांचे लांबविले.
चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप, कोयंडे तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांना तीन फ्लॅटमध्ये सोने तसेच रोख रक्कम मिळाली. मात्र दोन फ्लॅटमध्ये काहीही मिळाले नाही.दरम्यान स्वप्नलोकनगरीतील गणेश सुदाम खोपडे, लोकेश दशरथ भगत, अभिजीत शामराव फरगडे, श्रीमंत सुभाष बोडके, अविराज अशोक मालुसरे यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी चोरी केली.
विशेष म्हणजे चोरट्यांनी घराच्या दरवाजांना लोखंडी सेफ्टी दरवाजे असतानाही लोखंडी दरवाजे तोडून चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, हवालदार धर्मराज खांडे करीत आहेत.
