सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोरला तरुणांकडून अल्पवयीन निर्भयाचा विनयभंग
भोर शहरातील महाडनाका परिसरात घरात कोणी नसताना चार महिन्यांपासून वारंवार घरात जाऊन अश्लील व्हिडिओ दाखवीत आजी- आजोबांकडे राहणाऱ्या अल्पवयीन निर्भयाचा नराधम तरुणाने विनयभंग केल्याची घटना समोर आली.दरम्यान पीडितेच्या वडिलांनी भोर पोलिसात रविवार दि.२३ पोस्को अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत फिर्याद दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाडनाका परिसरात निर्भया अल्पवयीन मुलगी आजोबा- आजींसोबत राहत होती.ती इयत्ता नववीत शिकत असून घराशेजारी राहणारा गुन्हेगार तरुण पीडितेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्या घरी मागील तीन ते चार महिन्यांपासून वारंवार जाऊन बसत होता.
तो पिडीतेला अश्लील व्हिडिओ दाखवून आपण असे करू असे म्हणून लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत होता.तर हे कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकेल अशी धमकी पीडितेला देत होता.
दरम्यान मंगळवार दि.१८ गुन्हेगार तरुणाने पीडीतेचा हात धरून चल शेजारच्या घरी कोणी नाही. आपण तेथे जाऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करूया असे म्हणून तिला बळजबरी केली.
तुमचं येथे एकच घर आहे. माझं कोण वाकडं करणार आहे असेही म्हणाला. पीडितेने घाबरून झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. नराधम तरुणास भोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक निलेश माने, उपनिरीक्षक शीला खोत, हवालदार धर्मवीर खांडे, अभय बर्गे करीत आहेत.
