Bhor News l योगमहर्षी डॉ. कुवलयानंद स्वामी जयंती उत्साहात; निर्मला किंद्रे यांचा योग प्रमाणपत्र देऊन सन्मान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी 
निर्मला किंद्रे यांना योग प्रमाणपत्र देऊन सन्मानित 
     भोर येथे डॉ.कुवलयानंद स्वामी जयंती उत्साहात साजरी आली असून वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी योग पंडित निर्मला किंद्रे यांना योग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
       योगाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे थोर योगमहर्षी डॉ.कुवलयानंद स्वामी यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त योग विद्याधाम भोर यांच्या वतीने गंगूताई पंतसचिव वाचनालय भोर येथे सोमवार दि.३१ ऑगस्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे निसर्गोपचार तज्ञ डॉ.विनया पुंडे,ह.भ.प.राजेंद्र महाराज शास्त्री उपस्थित राहून योग व अध्यात्म याविषयी स्वामी कुलयानंद यांचे जीवनकार्य याविषयी माहिती सांगितली.
दरम्यान११ जुलैला आषाढी वारी निमित्त योग विद्याधाम पिंपरी चिंचवड,योग विद्याधाम भोर व योग विद्याधाम देहू यांनी सहभाग घेतलेल्या 'वारकरी मसाज सेवा' उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली झाल्याने सेवेत सहभागी झालेल्या सेवकांना म प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अध्यक्ष लगड,उपाध्यक्ष डॉ.आनंदा कंक, संस्थेच्या संस्थापिका व योग पंडित अनुराधाताई देवी,ज्ञयोग पंडित निर्मला किंद्रे, योगेश शेडगे, सागर शेटे,यशवंत भिलारे,रुपाली भेलके,सुनिता लगड उपस्थित होते.
Tags
To Top