Bhor News l गोरेगावकरांची वैद्यकीय सेवा आदर्शवत; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे गौरवोद्गार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी 
डॉक्टर रुग्णसेवेच्या माध्यमातून एका कोणाला आपले न समजता सर्व जाती धर्मांच्या लोकांना ते सेवा देत असतात. डॉ. गोरेगावकरांनी सुरुवातीच्या काळापासून भोर शहरासह तालुक्यातील रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याने त्यांचे वैद्यकीय सेवेतील काम आदर्शवत असल्याचे मत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
      भोर येथील डॉ. सुरेश गोरेगावकर यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात शनिवार दि.२२ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सबनीस बोलत होते. 
यावेळी राजेशराजे पंतसचिव, डॉ. कल्याण गंगवाल, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्ष ॲड. जयश्री शिंदे, प्रा. विजय जाधव, संतोष ढवळे, डॉ. इम्रान खान, प्रमोद गुजर, संतोष दळवी उपस्थित होते. कार्यक्रमात ग्रंथ, पुस्तके, वृक्ष अनेक शाळा, महाविद्यालये तसेच भोर तालुका पत्रकार संघाला वाटप करण्यात आले.
 डॉ. गंगवाल बोलताना म्हणाले वैद्यकीय व्यवसायाबरोबर डॉक्टरांकडे दुसरे अंग असते ते म्हणजे सामाजिक सेवा करणे. बहुतांशी वैद्यकीय सेवा देणारे लोक समाजाप्रती प्रामाणिक रुग्णसेवा करीत असतात. 
डॉ. गोरेगावकरांनी अनेक वर्षांच्या वैद्यकीय सेवेत पैशाला महत्त्व न देता सेवेला महत्त्व दिल्याने ते समाजाच्या तसेच रुग्णांच्या मनात एक आदर्श डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
Tags
To Top