Daund Breaking l राहूत विजेचा धक्का लागून चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; भावाला वाचवताना दुसऱ्याचाही जीव गेला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राहू : संदीप नवले
दौंड तालुक्यातील राहू नजीकच्या सोनवणेमळा येथे विजेचा तीव्र झटका बसल्यामुळे ओम नितीन भोईटे (वय १८) आणि रोहित अनिल भोईटे (वय २१) या सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटना बुधवार (दि.१९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे मळा येथील अनिल भोईटे यांच्या घरात सकाळच्या सुमारास घरगुती कामे करत असताना ओम भोईटे याला विजेचा जोरदार झटका बसला.भावाला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्याचा भाऊ रोहित याने मदतीसाठी धाव घेतली.
मात्र त्यालाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.दरम्यान, मुलांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही मदतीसाठी धाव घेतली होती.परंतु त्या सुदैवाने बचावल्या.दोन्ही भावांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. भोईटे परीवारातील ओम आणि रोहित हे दोघेही कष्टाळू व गरीब कुटुंबातील होते.दोन सख्ख्या भावांचा एकाच घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
To Top