Indapur News l भादलवाडीच्या शिवम कन्हेरकर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा; इंदापूर तालुक्यात प्रथम!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : संतोष माने 
वडील शेतकरी, परंतु इयत्ता पहिलीपासूनच शिक्षणाचा अथांग असा ध्यास. या जिद्दीच्या जोरावर इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मधील शिवम विनोद कन्हेरकर या विद्यार्थ्याने चालू वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये 92.67% गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक पटकाविला आहे. 
तर पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक तसेच इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक अशी गौरवस्पद कामगिरी केली आहे. शिवम हा अगदी अंगणवाडी पासून चाणाक्ष बुद्धीचा होता. त्याच्या या यशामध्ये मुख्याध्यापक नवनाथ मेटे, वर्गशिक्षक चंद्रकांत वनवे , उपशिक्षिका अनुश्री चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. याबाबत आम्ही शिवम चे वडील विनोद कन्हेरकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यावेळी मुलाच्या या आनंदाच्या यशाबद्दल त्यांचे डोळे भरून आले. 
त्यांनी सांगितले शिवम हा पहिल्यापासूनच अभ्यासू आहे. सतत अभ्यास, जिद्द व चिकाटी हे गुण त्याच्याकडे आहेत. याच जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. आगामी काळात त्याला भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात आय ए एस अधिकारी बनण्याचा त्याचा निर्धार आहे. 
शिवमच्या या यशाबद्दल भादलवाडी गावाचे नाव राज्यभर झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्ष होत आहे. एका छोट्याशा खेडेगावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या शिवम कन्हेरकर यांच्या यशाचे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.
To Top