सुपे परगणा l भोंडवेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी आप्पा भोंडवे यांची बिनविरोध निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी आप्पा दगडू भोंडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या अध्यक्षा यांनी राजीनामा दिल्याने या रिक्तपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन बारामती येथील श्रीहरी काळे, सचिव संजय जाधव, सहसचिव विठ्ठल गोसावी यांनी काम पाहिले.
      निवडीनंतर भोंडवे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक हरिभाऊ भोंडवे, उपाध्यक्ष गणेश जाधव, सोपान भोंडवे, उषा भोंडवे, फक्कड भोंडवे, कालिदास भोंडवे, शांताराम भोंडवे, राहुल भोंडवे आणि बापू मेरगळ आदीसह संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
      या संस्थेची एकुण सभासद संख्या ७४५ असुन भाग भांडवल ७३ लाख ५७ हजार आहे. तर या संस्थेने सुमारे ५ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. 
तसेच संस्थेची वार्षिक उलाढाल ७ कोटी ८४ लाख असल्याची माहिती सचिव संजय जाधव यांनी दिली.
To Top