Purandar News l ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमातून निरक्षर नागरिकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार’ – कृष्णकुमार पाटील

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्ट टीम----
पुरंदर : प्रतिनिधी 
 श्री भुलेश्वर मंदिर परिसरात NILP नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत साक्षरता जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी श्री. कृष्णकुमार पाटील. संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, श्री. शशिकांत म्हेत्रे. सहसंचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, श्री. सतीश चौधरी. सहाय्यक संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, श्री. रोहित यादव, प्रोग्राम कॉर्डिनेटर शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
     या प्रसंगी श्री भुलेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळशिरस, सन ब्राईट इंग्रजी मिडीयम शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून, पथनाट्य आणि साक्षरता गीते सादर केली.
तसेच असाक्षर नोंदणी केली.
     या प्रसंगी श्री. कृष्णकुमार पाटील यांनी सर्वांना साक्षरतेची शपथ दिली आणि योजना विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा, NMMS, इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, इतर शिष्यवृत्ती अशा विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली.
      या कार्यक्रमप्रसंगी पुरंदर तालुका पंचायत समितीचे सदस्य तथा माळशिरस गावचे माजी सरपंच माऊली यादव, पुरंदर तालुक्याचे गटविकास अधिकारी अविनाश थोरात, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे,केंद्रप्रमुख उमेश नेवसे, भुलेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक मंडळ तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
To Top