Satara News l १ सप्टेंबरपासून खुलणार कास पुष्पपठार; पर्यटकांसाठी नव्या सुविधांची मेजवानी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे 
जागतिक वारसा स्थळ व सातारचे वैभव असलेल्या पुष्पपठार कासचा हंगाम एक सप्टेंबर पासून सुरू होणार असून या वर्षीच्या हंगामासाठी वनविभाग व कास समितीकडून कास पठारावर आकर्षक पाॅंइट विकसित करण्यात आले असून यामुळे कासच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्याटिकांसाठी आकर्षक पॉईंट पर्वणी ठरणार आहे. 
कास पठारावर उन्हपावसाचा खेळ सुरू झाल्याने विविधरंगी फुलांची चाहूल लागली आहे. कास समितीकडून हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पोलिस प्रशासनासह स्वतः सर्व महत्त्वाचे अधिकारी व विभागांची मिटिंग घेऊन हंगामासाठी व पर्यटकांना सुलभ पर्यटन करता यावे म्हणून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. 
          गेल्या अनेक दिवसांपासून वनविभाग व कास समितीकडून पठारावर विविध कामे हाती घेण्यात आली होती. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून या नवीन कामांमुळे कासचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
नवीन पर्यटनासाठी काय आहे खास
1) नैसर्गिक लाकडी बांधकामाची आठवण करून देणारे विश्रांती कक्ष.

2) आकर्षक पॅगोडा 

3) कास तलाव व परिसराचा विहंगम नजारा पाहण्यासाठी मनोरा 

4) विविध ठिकाणी आकर्षक स्वागत कमान 

5) नैसर्गिक दगडी कमान 

6) लाल दगडी चि-याच्या आकर्षक पायवाटा.

7) महिलांसाठी हिरकणी कक्ष 
कास परिसराचे वैभव असलेल्या गवा, बिबट्या, हरिण, सांबर, मोर, माकड, वानर आदी प्राण्यांच्या प्रतिकृती कमानीशेजारी उभारल्याने व हे सर्व बांधकाम पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक देखणेपण असल्याने परिसराच्या वैभवात भर पडली आहे.

कार परिसरातील मंडपघळ, दगडी कमान, भगदार तळे, वेण्णा दर्शन पाॅंईट आदी नैसर्गिक ठिकाणी सुविधा निर्माण केल्या असून पर्यटकांनी फुलांबरोबरच या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा ही आनंद घ्यावा 
- प्रदीप कदम माजी अध्यक्ष कास समिती.
To Top