Bhor News l राजीव केळकर यांचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; पुरस्काराची रक्कम पूरग्रस्तांसाठी परत केली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के 
ध्रुव प्रतिष्ठान टीटेघर ता.भोर अध्यक्ष राजू केळकर यांना सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करून नेपाळ येथे गौरविण्यात आले. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला.
     निरूजा ग्रीन इंडिया–नेपाळ परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केळकर यांना त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवा,bशैक्षणिक उपक्रम, कोरोना काळातील मदतकार्य, ग्रामीण विकास आणि आपत्ती निवारणातील योगदानाची दखल घेऊन इंटरनॅशनल एक्सलंट लीडरशिप अवॉर्ड २०२६ तसेच मानव डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.सन्मानासोबत पुरस्काराची रोख रक्कम केळकर यांना देण्यात आली. मात्र राजीव केळकर यांनी नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुन्हा ती परत केली. त्यांच्या संवेदनशील निर्णयाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला डॉ. नीरज गुप्ता, पूजा गुप्ता, वीरगंजच्या संसद सदस्या, बिना शर्मा,डॉ. अरुण कुमार गुप्ता, पिया सिंह, अनिल कुमार, सुशील कुमार, ध्रुव प्रतिष्ठानच्या संचालिका मनीषा केळकर, वेदांती केळकर उपस्थित होत्या. अनेक वर्षांपासून समाजाप्रती निस्वार्थीपणे करत आलेली कामे, भोर तालुक्यातील नागरिकांनी समाजसेवा करताना दिलेला आशीर्वाद तसेच गोरगरीब नागरिकांना वेळोवेळी केलेली मदत सार्थ ठरली. समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजल्याने नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे दैनिक पुण्यनगरीशी बोलताना राजीव केळकर यांनी सांगितले.
Tags
To Top