सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर- शिरवळ मार्गावरील वडगाव राजेवाडी हद्दीतील वळणा शेजारील झाडाझुडपात एका तरुण महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असून या महिलेचा खून करून फेकून दिल्याचा संशय शिरवळ पोलिसांना आला असल्याने पुढील तपास सुरू आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर शिरवळ हद्दीवरील राजेवाडी गावच्या जवळील रस्त्याच्या वळणावर एका तरुण महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.शिरवळ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.मात्र हा अपघाती मृत्यू की खून याविषयी अजून साशंकता व्यक्त केली जात आहे.
