Indapur News l महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी बापू मोरे तर उपाध्यक्षपदी किशोर जगताप

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम 
इंदापूर : संतोष माने 
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाभुळगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी बापू विठ्ठल मोरे यांची उपाध्यक्ष पदी डाळज क्रमांक 2 ग्रामपंचायतचे कर्मचारी किशोर चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी इंदापूर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी मोरे तर उपाध्यक्षपदी जगताप यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी इतर कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली. अध्यक्ष बापू मोरे हे बाभुळगाव ग्रामपंचायत मध्ये तर उपाध्यक्ष किशोर जगताप हे टाळक क्रमांक 2 या ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत. या दोघांच्या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या निवडी नंतर अध्यक्ष मोरे व उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. ग्रामपंचायतच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आमचा घटक म्हणून त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिक आमचे प्राधान्य असेल.
To Top