बारामती l करंजे सोसायटीच्या अध्यक्षपदी राहुल शेंडकर यांची बिनविरोध निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल शेंडकर यांची आज, बुधवार (दि. २ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीला उपस्थित सर्व संचालक व सभासदांनी एकमताने अनुमोदन दिले.

करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना सन १९१८ मध्ये झाली असून, सोमेश्वर पंचक्रोशीतील अनेक गावे व शेतकऱ्यांशी या संस्थेची जुनी नाळ जोडलेली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत कर्जवाटप केले जाते. संस्थेमार्फत सध्या सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांचे पीककर्ज, २ कोटी २५ लाख रुपयांचे मध्यम मुदतीचे कर्ज तसेच विविध योजनांअंतर्गत इतर कर्जांचे वाटप करण्यात आले आहे.
संस्थेचे भागभांडवल जवळपास १ कोटी रुपये असून, व्यापारी गाळ्यांच्या भाड्यापोटीही संस्थेला उत्पन्न मिळते. संस्थेची कर्जवसुली सुमारे ८० टक्के आहे. नवनिर्वाचित चेअरमन राहुल शेंडकर यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. संस्थेमार्फत विविध योजना प्रभावीपणे राबविणे, पीक प्रात्यक्षिकांची पाहणी, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने तळागाळात जाऊन काम करण्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच निवृत्ती उर्फ बिंटू शेंडकर, अनिल गायकवाड, साहेबराव गायकवाड, माजी सरपंच वैभव गायकवाड, मावळते चेअरमन महेश शेंडकर, उपाध्यक्ष मचिंद्र शेंडकर, हनुमंत शेंडकर, नवनाथ शेडकर, ज्येष्ठ संचालक शशिकांत गायकवाड, शहाजी गायकवाड, विठ्ठल गायकवाड, तानाजी गायकवाड, रवींद्र गायकवाड, महिला संचालिका शकुंतला गायकवाड व कुसुम शेंडकर, संस्थेचे सचिव दीपक शिर्के व सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.

तसेच युवा कार्यकर्ते हरिष गायकवाड, धीरज गायकवाड आणि करंजेपुल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मयूर शेंडकर उपस्थित होते.
To Top